अवधूत गुप्ते ची निर्मिती , दिग्दर्शन आणि संगीत असल्यामुळे या चित्रपटाबद्दल लोकांना फारच अपेक्षा आहेत ... आणि त्या आशा अवधूतने भन्नाट संगीत देऊन कायम ठेवल्या आहेत ... गाणी ऐकल्यावर त्याच्याच शब्दात म्हणावसं वाटते .. ' मित्रा , तोडलंस रे ...'
- कोणता झेंडा घेऊ हाती - ज्ञानेश्वर मेश्राम सारख्या दमदार आवाजातले झकास गाणे ...
Rock संगीतात मधेच वाजणारे मृदुंग हा एक वेगळच प्रयोग अवधूत ने यशस्वी केला आहे... पुन्हा पुन्हा ऐकावेसे ... रोमांचक ..
- सावधान - यासारखे मराठी Hard Rock क्वचितच ऐकायला मिळते ... 'सावधान .. वणवा पेट घेतो आहे ' खरोखरच आग लावणारे गाणे आहे ...
- सांग ना रे मना - 'Not only Rock.. ' यापूर्वी अवधूतने romantic गाणीही छान केली आहेत .. हे ही एक असेच सुंदर गाणे स्वप्नील बांदोडकर आणि निहिरा जोशी च्या आवाजात..
- जल जले - नेहमीप्रमाणे एक तरी हिंदी गाणे अवधूत च्या अल्बम मध्ये असतेच .. यातही आहेत.. Guitar आणि Drums भन्नाट .... तितकेच जबरदस्त त्याने गायले आहे .
- आसूओ कि खवाइशे - आणखी एक हिंदी गाणे .. माहित नाही इतक्या हिंदी गाण्याची गरज आहे कि नाही चित्रपटात .. पाहिल्यावरच कळेल. ते काहीही असो गाणे एकदम 'कडक' आहे ... अप्रतिम कोरस ..
- पत्रास कारण कि बोलायची हिम्मत नाही - खरच मलाही बोलावसं वाटत नाही. फारशी वाद्ये न वापरताही प्रभावकारी वाटते.. शेतकऱ्याच्या आत्महत्येवर आधारित ....
- पाटील आला - एक ठीक ठाक लावणी ... आवडण्यासाठी कदाचित जरा जास्त वेळेस ऐकावी लागेल
- नाखवा रे (Bonus Track) - एक OK OK कोळीगीत ...
गीतकार गुरु ठाकूर , अरविंद जगताप , अवधूत यांनी लिहिलेल्या गाण्यान्माधील शब्द न शब्द प्रभावादार आहेत.. ताजेतवाने आहेत.. मित्रा अवधूत .. मराठी संगीतात असाच वादळ निर्माण करत राहा ...
जिंकलस रे लेका, चाबूक
Tuesday, February 8, 2011
अवधूतचा झेंडा उंच फडकू दे झेंडा संगीत विश्लेषण
Labels:
Marathi,
new song's,
zend amarathi movie song
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment